ताज्या बातम्या
05/12/2017
नोटीस
संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, शनिवार दिनांक १६/१२/२०१७ रोजी सकाळी
ठीक १०.०० वाजता ''श्री सत्यनारायणाची महापूजा" संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानिमित्त संस्थेचे कार्यालयीन कामकाज दुपारी ३.३० ते ७.०० वाजेपर्यंत चालू राहील याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.
29/04/2017
खूषखबर ! खूषखबर !! खूषखबर !!!


तातडीचे कर्ज मर्यादा रु. ५०,०००/- मंजूर

संस्थेच्या सभासदांच्या आग्रही मागणीनुसार विशेष सर्वसाधारण सभेत तातडीच्या कर्जाची मर्यादा रु. ५०,०००/- करण्याचा प्रस्ताव समंत करून घेऊन तो प्रस्ताव सहकार खात्याकडे मंजूरीस्तव पाठविण्यात आलेला होता. सदर प्रस्तावाचा मा. संचालक मंडळाने सातत्याने पाठपुरावा करून दिनांक २६ एप्रिल २०१७ रोजी सहकार खात्याकडून मंजूर करून घेतलेला आहे. त्यानुसार दिनांक २७ एप्रिल २०१७ च्या मा. संचालक मंडळाच्या मासिक सभेत तातडीचे कर्ज मर्यादा रु. ५०,०००/- करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर कर्जाचे परतफेडीचे कमाल हफ्ते २४ राहतील व कर्ज दिनांक ०२ मे २०१७ पासून वितरीत करण्यात येईल याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.
15/03/2017
विशेष सर्वसाधारण सभा (फक्त सभासदांसाठी)
रिलायन्स एनर्जी एम्प्लॉईस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. च्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २३ मार्च, २०१७ रोजी संध्याकाळी ठीक ६.०० वाजता मौलाना आझाद (नजमा हेपतुल्ला) सभागृह, प्रभात कॉलनी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५ येथे होणार आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, ही विनंती

-: सभेपुढील विषय :-

१. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अन्वये तातडीच्या कर्जाची मर्यादा रुपये ५००००/- करण्याबाबत उपविधी दुरुस्तीस विचार विनियम करून मान्यता घेणे.
२. दीर्घ मुदत व अल्प मुदत कर्ज वाटप एकूण मर्यादा रुपये १२ लाख करण्याबाबत मान्यता घेणे.
३. दीर्घ मुदत व अल्प मुदत कर्जाचा व्याज दर कमी करण्यास मान्यता घेणे.
४. मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.

स्थळ :- सांताक्रूझ, मुंबई.

टीप :-
१) सभेस आवश्यक असलेली गणसंख्या पूर्तता न झाल्यास, पुन्हा अर्ध्या तासाने त्याच ठिकाणी सभा सुरु केली जाईल व त्यासाठी गणसंख्येचे बंधन असणार नाही.
२) सभेमध्ये फक्त सभेपुढील विषयावरच चर्चा होईल याची सभासदांनी नोंद घ्यावी.
14/01/2017
नोटीस
कार्यालयीन वेळेत बदल
संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, दिनांक ०९.०१.२०१७ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत संस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक ०१.०२.२०१७ पासून संस्थेची कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी ११:३० ते संध्याकाळी ७:०० वाजता राहील, तसेच आर्थिक व्यवहार संध्याकाळी ६:४५ पर्यंत राहतील याची सर्व सभासदांनी नोंद घेऊन संस्थेस सहकार्य करावे ही विनंती.
तसेच जेवणाची वेळ दुपारी २:०० ते २:३० पर्यंत राहील.
29/12/2016
नोटीस
संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेने रेमी-गोरेगाव येथील ऑडीटोरीयम मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या पाल्यांचा शैक्षणिक पारितोषिक सोहळा गुरुवार दिनांक १२ जानेवारी, २०१७ रोजी आयोजित केलेला आहे. यवास्तव संस्थेचे कार्यालय दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुरु राहील याची सर्व सभासदांनी कृपया नोंद घ्यावी.
28/12/2016
नोटीस
संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेतर्फे उज्ज्वल यश संपादन केलेल्या शैक्षणिक पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार दि. १२.०१.२०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता रेमी ऑडीटोरियम हॉल, जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड, गोरेगाव (पूर्व) येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. पाल्याची उपस्थिती आवश्यक असून त्यांना प्रशस्ती पत्रक, रोख रक्कम व आकर्षक भेटवस्तू पारितोषिक स्वरूपात देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त सभासदांनी आपल्या पाल्यासोबत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कार्यक्रम यशस्वी करावा ही विनंती. धन्यवाद !
जयहिंद! जय सहकार !!
30/11/2016
नोटीस
संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, दि. २९ नोव्हेंबर, २०१६ रोजी झालेल्या मासिक सभेत सर्वांनुमते खालील ठराव समंत करण्यात आला. सदर ठरावाची अमंलबजावणी दि. ०१ डिसेंबर २०१६ पासून करण्यात येणार आहे. राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आपले मुदत ठेव व्याजदर कमी केले असल्यामुळे संस्थेस मुदत ठेवीचे व्याज दर कमी करणे क्रमप्राप्त झाले आहे. त्याप्रमाणे सोसायटीच्या सभासदांकडून मुदत ठेवी खालील नमूद केलेल्या अटी व नियमानुसार स्विकारण्यात येतील.

* १ वर्षासाठी ६.७५ % व्याज दर असेल.
* २ वर्षासाठी ७.२५ % व्याज दर असेल.
* ३ वर्षासाठी ०७ % व्याज दर असेल.
* ५ वर्षासाठी ०८ % व्याज दर असेल.

* मुदत ठेव १ वर्षाच्या आत रद्द केल्यास बचत ठेवीच्या दराप्रमाणे व्याज दिले जाईल.
तरी सभासदांनी कृपया याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद
24/10/2016
सस्नेह आमंत्रण
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संस्थेच्या कार्यालयात "लक्ष्मीपूजनाचा" कार्यक्रम दिनांक २७ ऑक्टोबर २०१६ रोजी दुपारी ४.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी सभासदांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती. आपणा सर्वांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!! कळावे,
05/10/2016
NOTICE
संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यास आनंद होत आहे की, ज्या सभासदांनी NEFT/ RTGS सुविधा स्विकारली आहे, त्या सभासदांची सणसंचय योजनेची रक्कम त्यांच्या बँक खात्यात NEFT/ RTGS मार्फत दि. ०५/१०/१६ रोजी जमा केली जाईल. तसेच ज्या सभासदांनी NEFT/ RTGS सुविधा स्विकारलेली नाही, त्या सभासदांची सण संचय रक्कम संस्थेमधील त्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येईल, याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.
01/07/2016
नोटीस
संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, सन २०१५ - १०१६ या आर्थिक वर्षासाठी संस्थेचा लाभांश (डिव्हीडंड) व सी.सी.डी. व्याज रक्कम त्यांच्या संस्थेतील बचत / सी.सी.डी. / कर्ज खात्यात वर्ग करायची असल्यास त्याबाबतचे पत्र दिनांक २२ जून, २०१६ पासून स्विकारण्यात येतील. दिनांक ३१ जुलै, २०१६ पर्यंत सदर अर्ज स्विकारले जातील.
धन्यवाद !!
22/06/2016
नोटीस
संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, सन २०१५-२०१६ या वर्षासाठी संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज दिनांक ३१ जुलै २०१६ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील. अर्जासोबत गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच ३१ जुलै २०१६ नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची कृपया सर्व सभासदांनी नोंद घ्यावी, सहकार्य करावे.
धन्यवाद !!
16/04/2016
नोटीस
खुशखबर !!! खुशखबर !!! खुशखबर !!!
कम्पलसरी क्युम्युलीटीव्ह डिपाॅझीट (C.C.D) रकमेत वाढ व्हावी या सभासदांकडून सतत होत असलेल्या मागणीचा कार्यकारिणी मंडळाने गांभीर्याने विचार विनिमय करून दिनांक २६/३/२०१६ रोजी झालेल्या मासिक सभेत C.C.D ची रक्कम रु. ४,००,०००/- वरून रु. ६,००,०००/- पर्यंत वाढविण्याचा ठराव सर्वानुमते संमत करून घेतला . सदर ठरावाची अंमलबजावणी दि. ०१ एप्रिल २०१६ पासून करण्यात येणार आहे .तरी सभासदांनी कृपया याची नोद घेऊन संस्थेस सहकार्य करावे. ही विनंती जय हिंद ! जय सरकार !
16/04/2016
नोटीस
कर्मचारी सहाय्य निधीत( M.B.F ) वाढ करण्याबाबत
सभासद बंधू भगिनींनो,
या पत्रकाद्वारे आपणास कळविण्यात येते की,०१ एप्रिल २०१५ पासून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यानां सहाय्य मिळण्याकरिता "कर्मचारी सहाय्य निधीत" संस्थेने १०० % वाढ केलेली होती. सभासदांना दिर्घ मुदत व अल्प मुदत कर्ज घेण्याकरिता जामिनदारांची संख्या ४ ऐवजी ०२ करण्याकरिता तसेच एखादा सभासदाचा दुर्दैवाने आकस्मिक मृत्यु झाल्यास त्याने घेतलेल्या कर्जावर सहानभूतीपूर्वक निर्णय घेऊन आर्थिक सहाय्य देण्याबाबत कार्यकारीणीने आपल्या दि. १६/०३/२०१६ रोजीच्या विशेष व्यवस्थापकीय समितीमध्ये कर्मचारी सहाय्य निधी रु.२० /- ऐवजी रु.१००/ करण्याचा महत्वपूर्व निर्णय घेतलेला आहे हा निर्णय दि.०१/०४/२०१६ पासून अमलात येणार आहे यांची सभासदानी नोद घेवून संस्थेस सहकार्य करावे, ही विनंती.
14/01/2016
नोटीस
संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेने रेमी-गोरेगाव येथील ऑडीटोरीयम मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या पाल्यांचा शैक्षणिक पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार दिनांक २१ जानेवारी, २०१६ रोजी आयोजीत केला आहे. यास्तव संस्थेचे कार्यालय दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुरु राहील याची सर्व सभासदांनी कृपया नोंद घ्यावी.
14/01/2016
नोटीस
संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, व्यवस्थापक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांचे "प्रशिक्षण शिबीर" शुक्रवार दिनांक १५ जानेवारी व शनिवार दिनांक १६ जानेवारी २०१६ रोजी असल्यामुळे संस्थेचे कार्यालय शुक्रवारी दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुरु राहील व शनिवारी बंद राहील याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी व संस्थेस सहकार्य करावे.
 
सदस्य प्रवेश
 
 
आमची ओळख
संपादकीय,

    पठाणाच्या प्रचंड व्याजाच्या जबड्यातून कर्जबाजारी होऊ पाहणा-या सभासदांची सुटका करण्यासाठी व वेळप्रसंगी आर्थिक मदत पुरविण्यासाठी १९४५-४६ साली भविष्य काळाचा पूर्ण विचार करून आस्थापनातील १५ व्यक्तींनी मिळून सोसायटीचं हे छोटंसं रोपटं लावलं. आज त्याचा प्रचंड वृक्ष झाला आहे आणि याच वृक्षाच्या सावलीत त्याचा मनसोक्त आनंद घेत आहोत.


"उत्त्पन्नापेक्षा गरजा जास्त” हे व्यस्त समीकरण मानवी जीवनातील एक न उलगडणारे कोडे आहे. आकस्मित ओढवणारे दुर्धर प्रसंग, संकटे, आजारीपणा वगैरे घटना मानवी जीवनात घडत असतात. अशावेळी नितांत गरज असते ती आर्थिक मदतीची. ही गरज थोड्या बहुत प्रमाणात का होईना भागविण्याचे काम सोसायटी करीत आहे. सोसायटीने सभासदांना वेगवेगळ्या प्रकारची कर्जे देऊन त्यांच्या संसारिक जीवनात बहुमोल सहाय्य करतानाच सभासदांना बचतीचे महत्व पटवून दिले आहे. सोसायटी व सभासद यांचे संबंध इतके जिव्हाळ्याचे आहेत की त्यामुळेच सोसायटी, आस्थापनातील एक प्रमुख अंग बनली आहे आणि म्हणूनच "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" हे संयुक्तीक ब्रीदवाक्य असलेल्या ह्या सोसायटीचे सभासदस्यत्व आपल्या आस्थापनाच्या बहुसंख्य कर्मचा-यांनी स्विकारले आहे.